आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वाकडी (केज) येथील जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षकांची पदे मंजूर असूनही ती रिक्त होती. तीन शिक्षकांवर सातवी पर्यंतच्या वर्गाचा ताण होता. त्यामुळे नवीन शिक्षक येण्याची वाट पहात बघता गावकऱ्यांनी एकत्रित येत लोकवर्गणीतून सव्वा लाख रुपये जमा केले. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन स्वयंसेवकांची पगारी नेमणूक केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चांगले शिक्षण देत सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. या गावात अगोदर सातवीपर्यंत शाळा होती. पटसंख्या कमी झाल्याने वर्ग कमी झाले.
शाळेत नव्याने आलेल्या शिक्षकांनी पालकांना समजावून सांगत गावाची शाळा कशी महत्वाची हे सांगितले. त्यामुळे पुन्हा पटसंख्या वाढली. पुन्हा सातवीपर्यंत वर्ग मंजूर झाले. सध्या शाळेची पटसंख्या १०४ आहे. त्यासाठी तीनच शिक्षक होते. दोन शिक्षकांची पदे रिक्त होती. तीन शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी येत होती. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याने पालकांना चिंता होती. पालकांनी पुन्हा मुलांना तालुक्याच्या शाळेत घालण्यासाठी शिक्षकांकडे टीसी मागण्यास सुरुवात केल्याने शाळा व शिक्षक अडचणीत आले. सात महिन्यापासून मानधन सुरु जून पासून हा लोकवर्गणीतून शिक्षिकांनी मानधन दिले जात आहे. शिक्षकांची संख्या वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळू लागले. वाकडी (केज) गावाने गावातील शाळा सुरू रहावी आणि चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्वांसमोर एक चांगल आदर्श घालून दिला आहे.
लोकवर्गणीतून मानधन
शिक्षकांनी पुढाकार घेत पालकांची समजूत काढली. तसेच नवीन शिक्षक येईपर्यंत गावातील उच्च शिक्षित दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचे सुचविले. स्वयंसेवकांचे मानधन लोकवर्गणीतून देण्याची सुचना केली. गावकरी, शालेय शिक्षण कमिटीचे, माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी देण्याचे ठरवले. ही माहिती ग्रामपंचायतच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकली. काही दिवसांमध्येच नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद देत सव्वा लाख रुपये जमा केले. त्यानुसार गावातील दोन उच्च शिक्षित महिलांची स्वयंसेवक म्हणून शाळेत नेमणूक केली. त्यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधनही सुरु केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.