आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सालेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२) विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक सुरेश रोहिणे, विकास गोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हणमंत गर्जे, मार्गदर्शक विज्ञान शिक्षक रुपेश सरवदे, शिवाजी कांबळे, शंकर गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नुकतीच तिसावी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद विभाग स्तरावर झाली.

त्यात कु. ऋतुजा योगेश बिराजदार व कु. प्रांजली किशोर गायकवाड यांचा जंगलातील जैविक व अजैविक घटकांचा शोध घेणे या प्रकल्पाचे राज्यस्तरासाठी निवड झाली. त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई मगर, सचिव प्रा. सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सहसचिव अशोकराव मोरे यांच्यासह संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...