आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:औषधी निर्माण अधिकारी कुरूम यांचा सत्कार

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील औषधी निर्माण अधिकारी सुधीर कुरूम यांचा सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्ववर्गणीतून येथील शांताई मंगल कार्यालयात आयोजित केलेला कार्यक्रमात स्नेहाच्या सुगंधाचे दर्शन घडून आले.

माणस स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांपासून दूर जाताना चित्र एका बाजूला दिसून येत असले तरी या सेवानिवृत्तीच्या समारंभात माणुसकीच्या स्नेहाचा सुगंध दरवळत असल्याचे दिसून आले.

तुगांव-अचलेर येथील सुधीर कुरुम यांनी उस्मानाबाद, बीड, नांदेड या विविध जिल्ह्यात २७ वर्ष आरोग्य सेवा केली. कोविड कालावधी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. शनिवारी (दि.३१) सेवानिवृत्तीबद्दल त्यांना आरोग्य कर्मचारी, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने निरोप व सत्कार करण्यात आला. माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव हे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी डॉ. लक्ष्मण सातपुते, डॉ. संतोष कांबळे, डॉ. जगनाथ कुलकर्णी, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. प्रवीण जगताप, विष्णू मुळे, दिलीप भोसले, डॉ. बिचकाटे, आश्विनी पाटील, अज्ञान जाधव, सुनिता घोडके, यास्मन मुल्ला, संगीता कुरले, बालिका गायकवाड, सुनिता मारकड, शोभा तुरोरे यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. कुरूम यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, माझ्या सेवानिवृत्तीला माणुसकीचा उजाळा मिळाल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. इसीजी तंत्रज्ञ पद्माकर घोगे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता कुरूम यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...