आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:परंड्यात 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयास मान्यता

उस्मानाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील परंडा शहरात १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास गुरुवारी (दि.२४) प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे जिल्ह्यातील दुसरे स्त्री रुग्णालय आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यापासून परंडा तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे महिलांना ये-जा करण्यात अडचण येत होती. परंडा तालुक्यातील महिलांची सोय व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने २९ सप्टेंबर २०२२ रोजी स्त्री रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवला होता.

आमदार डॉ. तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघात १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळाली असून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून इमारतीचे इस्टिमेट करण्यात येणार आहे. तसेच बांधकामासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. या रुग्णालयामुळे उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयावरील ताण कमी होणार असून बार्शी तालुक्यातील महिलांनाही फायदा होणार आहे. हा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...