आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजल जीवन मिशनअंतर्गत वेळापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ७१ कोटी ६३ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेला तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. केंद्राच्या यंत्रणेकडून या संदर्भातील आराखडा तयार करून घेतला जाईल. तांत्रिक मंजुरीनंतर लवकरच प्रशासनाकडून ही योजना कार्यान्वित केली जाणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे वेळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
पुढील ३० वर्षांचा विचार करून वेळापूरसाठी ही नवी पाणीपुरवठा योजना होणार आहे. यासाठी निरा कालव्याच्या वेळापूर डी-फोरजवळ उपकालव्याच्या उगमापासून पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे.
तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी नवी टाकी सध्या असणाऱ्या तलावाची पाणी साठवण क्षमता ४४ दश लक्ष लिटर इतकी आहे. याचे नूतनीकरण करून आरसीसी बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे याची साठवण क्षमता १३० दशलक्ष लिटर इतकी होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचेही नूतनीकरण होणार आहे. ग्राव्हीटेशनल फोर्स वेने पाणी पुरवठ्याकरीता २२ मीटर उंचीची टाकी बांधली जाणार आहे. सात नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.