आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अधिपत्याखालील भैरवनाथ शुगरला सोमवारी (दि. २) दिला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. कारखाना सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून कारखाना परिसर फुलांचे तोरण व नारळाच्या फांद्यांनी सजवण्यात आला.
तेरणा पट्ट्यातील ३४ हजार सभासदांची लक्ष्मी असलेला तेरणा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सोमवारी क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या थकीत भविष्य निर्वाह निधीपोटी कारखान्यास लावलेले सील काढले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे कारखान्यात आगमन झाले. त्यानंतर प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सर्व विभागांचा ताबा भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भैरवनाथ शुगर ग्रुपचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांचा सत्कार तेरणा बचाव समितीसह परिसरातील अनेकांनी केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे, गफार काझी, राजपाल देशमुख, अमोल समुद्रे, गुणवंत देशमुख, सतीश देशमुख, सतीश वाकुरे, संग्राम देशमुख, निहाल काझी, डी. एम. पाटील, राहुल वाकुरे, उर्वरित पान ४
‘गेट कधीही बंद होणार नाही’ कारखाना आमचा नसून तुम्हा सर्वांचा आहे. या भागाला पुन्हा गतवैभव मिळवून देणार असून यापुढे कधीही तेरणा साखर कारखान्याचे गेट बंद राहणार नाही. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा करावा, असे आवाहन अध्यक्ष सावंत यांनी उपस्थित शेतकरी, सभासदांना बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, या ठिकाणी राजकारण करायला आलो नाही. जे राजकारण करायचे ते या साखर कारखान्याच्या गेटच्या बाहेर असणार.
चौदा पथकांद्वारे पंचनामा भैरवनाथ शुगरला २५ वर्षासाठी कारखाना देताना बँकेच्या वतीने कारखान्याची २६२ एकर जमीन, ४० किलो लिटर क्षमतेचा आसवानी प्रकल्प, १४ मेगावॅटचा वीज प्रकल्प, सर्व विभाग आणि यातील मालमत्ता सुपूर्द करण्यात आली. या मालमत्तेचा पंचनामा करण्यात आला. याकरिता बँकेच्या वतीने १४ पथकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये बँकेचे ७० कर्मचारी, तेरणा कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी व साखर उद्योगातील तज्ञ मंडळींचा समावेश होता.
घडामोडी दृष्टिक्षेपात {२०१२ पासून कारखाना बंद, २०१३ पासून विविध आंदोलने. {२०२० मध्ये तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी तेरणा बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली. {समितीचा २२ फेब्रुवारी २०२१ ला कारखान्यावर भव्य मोर्चा. {जिल्हा बँकेने ३१२ कोटींच्या थकबाकीपोटी सरफेसी कायद्यान्वये कारखान्याचा घेतला ताबा. { २५ नोव्हेंबर २०२१ ला कारखाना भैरवनाथ शुगरला देण्याचा निविदा प्रक्रियेतून निर्णय झाला. {प्रक्रियेविरुद्ध अमित देशमुख यांचे ट्वेंटीवन शुगर उच्च न्यायालयात. {डीआरटी व डीआरएटी असा १३ महिने न्यायालयीन लढा सुरू. {२२ डिसेंबरला डीआरएटी कोर्टाने ट्वेंटीवनची याचिका फेटाळली. {अपिल केल्यास आत्मदहनाचा ‘आप’, शेतकऱ्यांनी दिला इशारा. {शुक्रवारी (दि. ३०) जिल्हाधिकाऱ्यांसमोर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जिल्हा बँकेला तांत्रिकदृष्ट्या दिला ताबा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.