आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसक्या आवळल्या:चालत्या गाडीतून बॅगा चाेरणाऱ्यास अटक ; येरमाळा पोलिसांची धडक कारवाई

येरमाळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुर-धुळे महा मार्गावरील येरमाळा येथील भारत पेट्रोल पंप जवळ चालत्या गाडीतून बॅगा काढुन लुट केली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच येरमाळा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दोन दिवसात बॅगसकट चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.तीन नोव्हेंबर रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास मालेगाव जि. नाशिक येथील फकिरा इस्माईल शेख हे त्यांच्या कुटुंबीयांसह मिनी ट्रॅव्हल्सने हैदराबादला जात होते. त्यांच्या ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या सात बॅगा पैकी पाच बॅग ज्यामध्ये कपडे, एक मोबाईल व रोख २८ हजार रुपये असे एकुण ३९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चालत्या ट्रॅव्हल्सवर चढून चोरला होता. या प्रकरणी लक्ष्मी पारधी पेढी तेरखेडा येथून दत्ता दादा काळे वय २० वर्षे यास ताब्यात घेतले. त्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या बॅगा पैकी चार बॅगा तसेच नगदी २५ हजार १५० रुपये व एक मोबाईल असे एकुण ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...