आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीर:लोहारा येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिबीर; नागरिकांचा प्रतिसाद

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक दिवसाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकालाच शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम असणे खूप गरजेचे असते. बदलत्या जीवन शैलीमुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप वाढत असल्याचे दिसुन येत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे योग व प्राणायाम नियमित करणे हाच आहे.

त्यानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात दि.३१ मे ते ५ जून दरम्यान योग व प्राणायाम शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकाग्रता, पंचप्राण ज्ञानेंद्रिये पंचतत्व अष्टांग – यम- नियम- आसन- प्राणायम -प्रत्याहार-धारना – ध्यान – समाधी हि अष्टांग योग तसेच पंचकोश याबाबतची महत्वाची माहिती प्रात्यक्षिक द्वारे दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आनंदी व समाधानी, निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन केले असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे विकास होंडराव यांनी यावेळी सांगितले. शिबाराच्या शेवटच्या दिवशी योग शिक्षक बालाजी मक्तेदार, योग शिक्षक शशिकांत कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...