आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराची संधी:नवरात्र महोत्सवात बचत गटातील तब्बल शंभर महिलांना मिळाली रोजगाराची संधी

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र महोत्सवात नगरपालिकेचा वतीने बचत गटांना दर्शन मंडप तसेच वाहनतळावर स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्टाॅलमध्ये प्रसाद, खाद्यपदार्थ तसेच मसाले विक्री करण्यात येत आहे. या माध्यमातून १०० महिलांना रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात पालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाच्या महजबीन शेख यांनी घाटशीळ रोड वाहनतळ येथील दर्शन मंडप तसेच विविध वाहनतळावर बचत गटाच्या महिलांना स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी नगरपालिकेने नाममात्र शुल्क आकारले आहेत. या बचत गटाच्या महिला व पुरुषांना पालिकेच्या वतीने ओळख पत्र देण्यात आले. यामुळे संपूर्ण दर्शन रांगेत विना अडथळा व्यवसाय करू शकले. यामुळे बचत गटाच्या महिलांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळाला: ३२ महिला, पुरुषांना दर्शन मंडपात खाद्य पदार्थ, उपवासाचे साहित्य, पाण्याचे बाॅटल, बिस्कीट, चहा विक्री साठी परवाना देण्यात आला आहे. या शिवाय बचत गटाच्या ९ महिलांना तीन चप्पल स्टँडचा परवाना देण्यात आला आहे.

मसाले विक्री स्टाॅलला प्रतिसाद
दिव्यांग बचत गटाने गरम मसाले विक्रीचा स्टाॅल लावला आहे. या स्टाॅलला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बचत गटात १० दिव्यांग महिला - पुरूष आहेत. या शिवाय दिव्यागांना चप्पल स्टॅँड, क्लॉक रूम आदींचे स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...