आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंजोटी:वाचन संस्कृती रुजल्याने मनासह मेंदूही मजबूत होतो

गुंजोटी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाचन संस्कृतीची रुजवात झाल्यामुळे मन आणि मेदू मजबूत होतो, व त्यातून समाजकार्य करण्यासाठी आवश्यक ती ताठरता मनगटात येते, असे प्रतिपादन कॉ. अरुणकुमार रेणके यांनी केले. येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत मुरळी (ता. उमरगा) येथे सुरू असलेले सात दिवसीय ग्राम स्वच्छता व जल संवर्धनासाठी युवक या विशेष शिबिराच्या समारोपप्रसंगी बुधवारी (दि.३०) रेणके प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी होते. यावेळी सरपंच नयनाताई कांबळे, मुख्याध्यापक डी. एम. शेवाळकर, अजीज इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात डॉ. रमेश पात्रे यांनी ‘वर्तमान काळात व्यायामाची गरज’ या विषयावर तर प्रा. राजाराम निगडे, प्रा. एस. एस. बडोदकर यांनी ‘आजच्या युवकांसमोरील आव्हाने’, प्रा. इब्राहिम इनामदार यांनी ‘ग्रामीण विकासात डिजिटल युगाचे योगदान’ आणि डॉ. एम. सी. खोत यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान दिले. शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रामदास कोळी, डॉ. रमेश पात्रे, डॉ. एम. अंबुसे, डॉ. डी. पी. चव्हाण, डॉ. के. एल. कदम, सिद्राम देशमुख, ग्रामस्थांसह शिबिरार्थींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...