आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खड्ड्यातील खडीचे फोटो काढताच टाकले डांबर ; खड्डे बुजविण्याच्या कामात सारवासारवीचा प्रकार

वाशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी - शहर ते कळंब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामामध्ये संबंधित गुत्तेदाराने ऐन चौकात बिगर डांबराचे खड्डे बुजविल्याचा प्रकार सोमवारी (दि.७) घडला होता. पावसाळ्यापूर्वी पडलेल्या खड्ड्यांनी आता मोठे रूप घेतले असल्याने सोमवारी कळंब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वाशी शहरातील पारा चौक येथून सुरु करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीच उपस्थित नसल्याने ऐन चौकातच संबंधित गुत्तेदाराकडून खड्ड्यामध्ये दिशाभूल करत कुठेतरी डांबर टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची दबाई करून रोलर पुढे देखील नेण्यात आला होता.

मात्र सदरील बुजविलेल्या खड्ड्यामध्ये डांबरच टाकलेले नसल्याचे निदर्शनास आल्याने दिव्यमराठीकडून खड्ड्यातील खडी बाजूला सारून फोटो काढण्यात आल्याने तसेच सदरील प्रकार आजूबाजूच्या नागरिकांना लक्षात आल्याने ओरड निर्माण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी चौक गाठत सर्व खड्ड्यामध्ये डांबर टाकण्यास व पुन्हा खडी भरून रोलर फिरविण्यास लावले. घडलेल्या प्रकारामुळे गुत्तेदार हे केवळ आपला खिसा भरत आहेत. खड्डे बुजविण्याचे असा प्रकार ऐन चौकात होत असेल तर पुढे गेल्यानंतर त्यांचेच राज्य का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

चांगले काम करण्याच्या सूचना कामास सुरुवात होताच तक्रार आल्याने अभियंता याना त्या ठिकाणी जाऊन कामाचा दर्जा राखण्यास सांगितले आहे. पुढेही काम सुरु असताना एक अभियंता कायम कामाच्या ठिकाणी उपस्थित ठेऊन चांगले काम करून घेण्यात येणार आहे. तरीही काही तक्रार असल्यास उपस्थित अभियंता याना तिचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंगद शिंदे ,सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशी

बातम्या आणखी आहेत...