आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासाभरात दर्शन:शाळा सुरू होताच तुळजापुरातील गर्दी ओसरली, तासाभरात दर्शन ; चार महिन्यांपासून तुळजाईनगरी भक्तिमय

तुळजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा महाविद्यालयांच्या सुट्या संपल्या आहेत. नुकत्याच शाळा सुरु झाल्या. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूर मधील भाविकांची गर्दी ओसरली आहे. एप्रिल-मे महिन्यात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागत होता तेथे शुक्रवारी केवळ तासाभरात भाविकांचे दर्शन होत होते. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून तुळजाईनगरी भक्तिमय झाली होती. मागील दोन महिन्यात भक्तांची अधिक रेलचेल असल्याने दर्शनासाठी अधिक वेळ लागत होता. शाळांना सुट्या आणि लग्न सराईमुळे मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यात भाविकांची गर्दी कायम होती. मात्र, जून महिना उजाडताच भाविकांची गर्दी ओसरली. शुक्रवारी पहाटे ०४:३० च्या सुमारास चरण तीर्थ पुजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ०६ वाजता अभिषेक पुजेला प्रारंभ करण्यात आला. सकाळी ०९ वाजता अभिषेक पूजा संपवली.

केवळ तासाभरात धर्मदर्शन, मुख-सशुल्क रिकामे संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यात तुळजाभवानी मातेचा दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवारी, रविवार तसेच पौर्णिमा व सुटीच्या दिवशी चार ते पाच तासांचा कालावधी होता. या शिवाय या कालावधीत दररोजच दोन ते अडीच तास दर्शना ला लागत होता. मात्र सुट्या संपताच गर्दी ओसरल्याने शुक्रवारी केवळ तासाभरात भाविकांचे दर्शन होत होते. तर मुख दर्शन व सशुल्क दर्शन रांगा रिकाम्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...