आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती शिवार:जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र 10 हजार हेक्टरने वाढल्याने खतांचा वाढीव साठा मंजूर

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाची कृपादृष्टी असल्यामुळे यंदा खरिपासह रब्बी आणि उन्हाळी पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहेत. खरिपाचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढले आहेत. त्यानुसार शासनाकडून जास्तीचे खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी गेल्यावर्षी ६३ हजार आवंटन मंजूर होते, यंदा ७५ हजार २७० हजार मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी मंजूर खत आकडा कमी असला तरी प्रत्यक्ष वापर ८८ हजार मेट्रिक टन खतांचा वापर करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन काढणीच्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पट्टा पद्धतीने सोयाबीन लावल्यास नुकसान होणार नाही. अधिक माहिती कृषी विभागाच्या सर्व कार्यालयात उपलब्ध आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून प्रत्येक औषध विक्रेते आणि खत विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर शेतकऱ्यांसाठी बॅनर तयार करुन लावले आहेत. त्यात खत घेताना पक्की पावती घ्यावी. खंताची आणि बियाणांची खरेदी करताना एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करावी. फवारणी करताना घ्यावयाची काळजी आदी बाबी यात स्पष्ट केल्या आहेत. अशा प्रकारे करता येतील शेतकऱ्यांना गावोगावी मिश्र खते ... ५० किलो खत तयार करण्यासाठी लागणारी खतांची मात्रा (किलोमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. खताचे नाव १५:१५:१५ , युरिया १७, सिंगल सुपर फॉस्‌फेट ४७ , एमओपी १३, खताचे नाव १०:२६:२६, युरिया ११, सिंगल सुपर फॉस्‌फेट ८२, एमओपी २२, खताचे नाव १२:३२:१६, युरिया १३, सिंगल सुपर फॉस्‌फेट १०० , एमओपी १.४ , खताचे नाव डीएपी, युरिया २०, सिंगल सुपर फॉस्‌फेट १४४ , एमओपी ०, खताचे नाव २०:२०:०, युरिया २२, सिंगल सुपर फॉस्‌फेट ६३, एमओपी ०, खताचे नाव १९:१९:१९, युरिया २१, सिंगल सुपर फॉस्‌फेट ६०, एमओपी १६, खताचे नाव २४:२४:०, युरिया २६, सिंगल सुपर फॉस्‌फेट ७५, एमओपी ०, खताचे नाव १४:३५:१४, युरिया १६, सिंगल सुपर फॉस्‌फेट ११०, एमओपी १२, खताचे नाव १८:१८:१०, युरिया १२, सिंगल सुपर फॉस्‌फेट ५६, एमओपी ९ जिल्ह्यातील खतांचीही माहिती ऑनलाइन जिल्यात ९७८ कृषी सेवा केंद्र परवाना धारक असले तरी, प्रत्यक्षात ८०० कृषी सेवा केंद्र सुरु आहेत. रासायनिक खते खरेदी करताना ती अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून पॉस मशीन वरून व खरेदीच्या पक्क्या पावतीसह खरेदी करावीत. आपल्या भागात कोणत्या किरकोळ विक्रेत्यांकडे कोणत्या प्रकारचे किती खत आहे, हे Osmanabadaso.blogspot.com या blog मधून जाणून घ्यावे. विशिष्ट खतांचा आग्रह नको एखादे एपीके ग्रेड चे खत त्वरित उपलब्ध नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पीडीएम वा म्युरेट ऑफ पोटॅश अशी तीन सरळ खते उपलब्ध असली तर त्यापासून जगातील कोणत्याही ग्रेडचे एपीके खत घरच्या घरी तयार करता येऊ शकते. एखाद्या ग्रेडचे ५० किलो खत तयार करण्यासाठी आवश्यक सरळ खते यांचे नियोजनही जाहिर करण्यात आले.

प्रश्न – खतांचा साठा मुबलक आहेत का‌‌? उत्तर – खतांचा साठा मुबलक नसला तरी, पुरेसा आहे. शासनाकडून आवंटन मंजूर करण्यात आले आहेत. खतांची तक्रार असल्यास कार्यालयात, भ्रमणध्वनीवर करावी. खतांचा साठा कळण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा आहे. प्रश्न – सोयाबीनचे नुकसान झाले होते, यंदा काय काळजी घ्यावी. उत्तर – शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच कोणतेही बियाने वापरताना बीज प्रक्रिया करुनच लागवड करावी. तसेच दिड इंच पेक्षा जास्त खोल लावू नये. तसेच ओल बघूनच पेरणी करावी. प्रश्न – आपल्या विभागाकडून सध्या काय कामे केली जात आहेत ? उत्तर – बियाणे, खतं आदींचे नियोजन करण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक संबंधीत विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर बॅनर लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...