आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:तुळजाभवानी अभियांत्रिकीच्या प्राचार्यपदी प्रा. रवी मुदकन्ना

तुळजापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. रवी मुदकन्ना यांची नियुक्ती झाली. माजी प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड यांच्या राजीनाम्याने पद रिक्त होते. मुदकन्ना यांच्या निवडीने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले जात आहे. प्रा. पेरगाड यांनी दिलेला प्राचार्यपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. अखेर शुक्रवारी (दि. १०) प्रा. मुदकन्ना यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी २०२२ पासूनचे वेतन रखडले होते. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या धामधूमीत प्रा. पेरगाड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मुदकन्ना यांच्या निवडीनंतर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती प्रा. मुदकन्ना यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...