आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नळदुर्ग सोसायटी निवडणुकीत अशोक जगदाळे यांना 13 पैकी 10 जागा; कृषी विकास आघाडीची विरोधकांना धोबीपछाड

नळदुर्ग18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेना पुरस्कृत कृषी विकास आघाडी पॅनेलने काँग्रेससह सर्व पक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनलचा पराभव करुन धोबीपछाड देत सोसायटीवर आपला झेंडा फडकावून वर्चस्व निर्माण केले आहे.

नागणे रघुनाथ निवृत्ती (३६७),पाटील शाहुराज भाऊराव (३८८),पाटील सुहास सुर्यकांत (३९०),सय्यद ताजोद्दीन तय्यबअली (३६७),तिवारी मदन चंदुलाल (३७४),बनसोडे लक्ष्मीबाई ब्रम्हचार्य (४०६), बिराजदार महादेव शंकर (४३५),जाधव उमाबाई दयानंद (३८१) हे उमेदवार विजयी झाले तर काँग्रेससह सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनलचे कोरे दत्तात्रय निलप्पा (३७०),पुदाले विनायक रमेश (३९०) व हजारे संतोषी सुरेशसिंग (३६७) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

त्याचबरोबर या निवडणुकीत मत बाद होण्याचे प्रमाणही बरेच होते. यामध्ये सर्वसाधारण गटात ४२,महिला गटात ५१,अनुसुचित जाती जमाती गटात ३८,ओबीसी गटात ३२ तर व्हीजेएनटी गटात ३२ अशाप्रकारे मतदान बाद झाले आहे.नकृषी विकास आघाडी पॅनलचे बेडगे संजय अप्पाराव (३७०),चव्हाण सुधाकर निवृत्ती (३६६), सुधाकर चव्हाण आणि शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनलचे जयवंत मुळे यांना समसमान ३६६ मते मिळाली होती यानंतर चिठ्ठी काढून विजयी घोषित करण्यामध्ये सुधाकर चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे सुधाकर चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. िवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले तर त्यांना सुधीर पुराणिक यांनी सहकार्य केले.

यावेळी मतदान केंद्रावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मतदान सुरू असताना कांही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.पॅनल विजयी होण्यासाठी कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकुर, नितीन कासार, नवल जाधव, अमृत पुदाले व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक
नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १२ जून रोजी पार पडली. कृषी विकास आघाडी पॅनल व काँग्रेससह सर्व पक्षिय पुरस्कृत शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनल या दोन पॅनेलमध्ये अतिशय चुरशीची झाली.अशोक जगदाळे व शिवसेना पुरस्कृत कृषी विकास आघाडी पॅनलचे १३ पैकी १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेससह सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...