आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंडा:आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला, डोळ्यात चटणी टाकून दगड, काठ्या, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर डोळ्यात चटणी टाकून दगड, काठ्या, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यासह पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना सोमवारी (४ एप्रिल) शहरापासून ४ किलोमीटर अंतरावरील परंडा-कुर्डुवाडी मार्गालगतच्या पाटील वस्तीवर रात्री १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील वस्ती येथील औदुंबर प्रकाश पाटील यांना शेतीच्या वादातून आरोपी कृष्णा पाटील, उमाकांत पाटील, रामराजे पाटील, पल्लवी पाटील, मुकुंद पाटील, गोविंद पाटील आदींनी संगनमत करून सोमवारी कोयता, दगड व काठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी परंडा पोलिसांत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. तर राहुल पाटील यांच्या शेतातील उसाच्या कारणावरून यातील आरोपीने १६ मार्चला मारहाण केल्याने ऊस चोरीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करण्यासाठी पथक वस्तीवर गेले असता ४ ते ५ आरोपींनी हल्ला चढवला. ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली व अन्य चौघे फरार आहेत.

अटक टाळण्यासाठी स्वत:वर ब्लेडने वार
पत्र्याच्या शेडचा दरवाजा आतून बंद केल्याने आरोपींना अटक करता आली नाही. यातील ६ आरोपींपैकी कृष्णा पाटील, पल्लवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.तसेच यातील आरोपींनी अटक टाळण्यासाठी स्वत:च्या हाता-पायांवर ब्लेडने वार करून घेतले.

पोलिसांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांनी वस्तीकडे धाव घेतली. पोलिसांवर हल्ला झाल्याने ठाण्यातील पथक घटनास्थळी पोहोचले व जखमी सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाणे, पो.ना.भांगे व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...