आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना दोन लाख रू.ची मदत; माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांची घोषणा

भूम8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुण मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या शिफारशी वरून प्रत्येक वर्षी दोन लाख रुपये पुढील शिक्षणाच्या मदतीसाठी देणार असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी घोषित केले.ते दि.१९ रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, प्राचार्य शिक्षक व पालक सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठीत नागरिक, विविध शाळेंचे मुख्याध्यापक उपस्थीत होते. यापुढे बोलताना संजय गाढवे म्हणाले की, शहरात स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महागडी पुस्तके विकत घेणे शक्य होत नाही त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने त्या कुटुंबाला परवडत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी भूम नगरपरिषदच्या माध्यमातून सुसज्ज अभ्यासिका वर्षभरात उभारणार असल्याचे जाहिर केले.

काही शिक्षण संस्था यामध्ये राजकारण करत आहेत कृपया असे भविष्यामध्ये करू नका आम्ही कौतुक व प्रोत्साहनासाठी कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे, प्रा.श्रीकृष्ण चंदनशिव,ए.एल. ढोले, बापुजी सुकाळे, प्रा. संतोष शिंदे,प्रा. ज्योती डुंगरवाल, तात्याबा कांबळे, साहिल गाढवे, किरण जाधव, संजय साबळे,सूरज गाढवे, संदीप गाढवे यांच्यासह प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...