आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगाम:शेतकऱ्यांच्या उसाचे एक कांडकेही शिल्लक ठेवणार नसल्याची ग्वाही ; 15 दिवसांत पैसे मिळणार

नळदुर्ग23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचे एक कांडकेही शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेऊ मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना आपलाच आहे हा विचार करून कारखान्याला परिपक्व ऊस घालावा, जेणेकरून ऊसाला चांगल्या प्रकारची रिकव्हरी आल्यास शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीचा भाव देण्यासाठी अडचण येणार नाही, असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यांनी व्यक्त केले. श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याच्या गव्हाणीत शनिवारी (दि.५) मोळी टाकून दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात अाला. यावेळी माजी मंत्री चव्हाण बाेलत हाेते. यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण, तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, अशोक मगर, नय्यरपाशा जागीरदार, शहेबाज काजी, मुस्ताक कुरेशी, बसवराज धरणे, सुनील रोचकरी, नळदुर्ग काँग्रेस अध्यक्ष नवाज काजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजित चव्हाण यांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करण्यात आले तर रणवीर चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साखर कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले, कारखान्याचे चीफ इंजिनियर शत्रुघ्न जाधव, चीफ केमिस्ट गोविंद पाखले, रामचंद्र भोसले, तानाजी पाटील, यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम वेळेवर सुरू झाल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण व गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले हे प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी चव्हाण व आभार प्रदीप पवार यांनी मानले.

१५ दिवसांत मिळणार पैसे
कारखान्याच्या वतीने २२५० चा पहिला हप्ता गोकुळ शुगरच्या दोन्ही युनिटमध्ये ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तसेच पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचा ऊस कारखान्याला घालावे असे आवाहन गोकुळ शुगर युनिट १ चे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...