आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:देऊळगाव झेडपी शाळेत आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीसह विकली भेळ, भजी

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत प्रत्येक शनिवार विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. शनिवार (दि.१७) आनंद बाजारचे नियोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आठवडाभर या उपक्रमाचे नियोजन करुन तयारी पूर्ण केली होती.

आनंद बाजारात विद्यार्थ्यानी स्वतः भेळ, उडीद वडे, भजी, गुळ -शेंगदाणे, इडली सांबर, चहा आदी खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारले होते. तसेच भाजीपाला विक्रीही केली. विद्यार्थ्यानी झोपाळे, घसरगुंडी या ठिकाणी मुलांना खेळासाठी तिकीट लावले होते. मुलांना व्यावहारिक जीवन कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच गणित विषयातील नफा-तोटा घटक, नागरिक शास्त्रातील जकात, बाजार कर आदी गोष्टींचे ज्ञान झाले.

बाल आनंद बाजार या उपक्रमातून चार हजार रुपयांची उलाढाल झाली. यामधून उद्याचे व्यावसायिक कौशल्य मुलांमध्ये निश्चित आत्मसात होतील. कार्यक्रमास गावातील लहान थोर मंडळींसह महिला उपस्थित होत्या. मुलगा-मुलगी समान हा संदेशही या आनंद मेळाव्यात देण्यात आला. स्त्री-पुरुष समानतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या. आनंद बाजाराचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अभिजीत गाढवे, सतीश ढाळे, तात्यासाहेब सूर्यवंशी, संतोष बदर, नामदेव गाढवे, चिंतामणी गुलाखे, बाबा माने, सुब्राव ढवळे, अन्वर सय्यद, अनिता गाढवे, लता घोगरे, संगीता पाटील, अश्विनी सूर्यवंशी, साधना पाटील, छाया गाढवे आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सचिन सूर्यवंशी, सुब्राव सुरवसे, अनंत वाघमोडे, प्रशांत गोकुळे, नामदेव निलंगे, अनिल काळे आदींनी परिश्रम घेतले. गटशिक्षणधिकारी सूर्यभान हाके यांनी विद्यार्थी, पालक शिक्षकांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...