आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पाथरूड येथे स्टेट बँकेसाठी मंत्र्यांना साकडे घालणार ; डॉ. भागवत कराड यांना दिले निवेदन

पाथरूडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील पाथरूड पेढा व खव्यासाठी प्रसिद्ध आहे. यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीसाठी स्टेट बँकेच्या शाखेची मागणी आहे. पाथरूडमध्ये राष्ट्रीयीकृत बँक व्हावी यासाठी पाथरूड ग्रामस्थांच्या वतीने भाजप नेते अॅड. मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच मंत्री महोदयाची तारीख घेऊन लवकरच संभाजीनगर येथे भेटण्यासाठी मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरूडचे शिष्टमंडळ जाणार आहे तसे आश्वासन मिलिंद पाटील यांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी हार फेटा पुष्पगुच्छ देऊन मिलिंद पाटील यांचा ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच तानाजी बोराडे, संजय बोराडे, शुभम तिकटे, डॉक्टर भरत दळवी, महादेव वडेकर, चेतन बोराडे, श्रीराम वनवे, अशोक भसाड, उमाची वाडीचे उपसरपंच प्रदीप शेळके, भाऊसाहेब बोराडे, भरत बोराड, दादासाहेब शेळके, विनोद गावडे, जयराम गव्हाणे, तात्यासाहेब बोराडे, राजेंद्र तिकटे, समाधान दळवे, प्रभू माने, चिंतन काटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...