आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ८,१० व १२ वर्षाखालील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर स्पर्धेसाठी उस्मानाबाद ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटना व क्रीडा भारती यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे दि. २२ फेब्रुवारी२०२३ रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेली आहे.
यामध्ये ८ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - ५० मी ,८० मी , लांब उडी , ४५०मी शटल रिले व १० वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा ५० मी ,१०० मी , लांब उडी , गोळा फेक, ४१०० मी रिले आणि १२ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - ६० मी , २००मी , उंच उडी , लांब उडी व इतर स्पर्धांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.