आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन:बालिकेवर अत्याचार;नराधमास कठोर शिक्षा द्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा देण्याची मागणी अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचारविरोधी समितीच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, प्रकरणातील दोषींविरुद्ध द्रुतगती न्यायालयात खटला चालवून तत्काळ कठोर शिक्षा द्यावी.

या प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी तत्काळ दोषारोपपत्र दाखल करावे. त्यासाठी तत्काळ पावले उचलून आवश्यक पुरावे गोळा करावे व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. पीडित कुटुंबाच्या जीवितास आरोपींच्या नातेवाइकांकडून धोक्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पीडित कुटुंबास संरक्षण द्यावे. निवेदनावर फारुख शेख, इरफान शेख, जमील पठाण, अझहर शेख, जावेद पठाण, अय्युब जिनेरी, मुझीब काझी, नसीर शहाबर्फीवाले, बिलाल कुरेशी, दत्ता मेहेर, अब्बास मुजावर, समीर पठाण, गुलाब सत्तार, मैनोद्दीन तुटके, समीर पठाण आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...