आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:मुलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी अनोळखी असल्यामुळे मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून स्केच तयार करण्यात आले होते. तपासात पोलिसांनी पूर्ण कसब लावल्याने तसेच सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे नराधम गजाआड गेला.

विशेष शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या एका गावात १३ वर्षीय मुलगी शाळेतून घरी आली. गावाबाहेर उसाच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी ती एकटी गेली होती. त्या ठिकाणी एक अनोळखी माणूस आला व त्याने तिला ऊसाच्या शेतात नेत मारहाण केली, तोंड दाबून अत्याचार केला होता. दरम्यान, मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. लाइनमनची साक्ष ठरली महत्त्वाची : घटनास्थळच्या बाजूच्या रस्त्यावरील पानटपरी चालकाने घटनेच्या वेळी आरोपीला वाहन रस्त्यावर लावून पाण्याची बाटली घेऊन उसात गेल्याचे पाहिले होते. तसेच घटनेच्या वेळी महामार्गावर लाइट खांबावर काम करीत असणाऱ्या दोन लाइनमननी त्याला उसात गेल्याचे व त्या ठिकाणी एका मुलीला उचलल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...