आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला; 15 आरोपी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

उमरगा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर कलबुर्गी जिल्ह्यातील एका पोलिस अधिकाऱ्यावर शुक्रवारी (दि. २३) रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी थोरलेवाडीतील १५ संशयितांना नेण्यात आले आहे. यापूर्वी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.कर्नाटकातील कलबुर्गी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सीपीआय श्रीमंत एल्लाळ एका गांजा तस्करीच्या प्रकरणात शुक्रवारी रात्री तपास करीत सीमेवरील बसवकल्याण तालुक्यातील व्हन्नाळी शिवारात आले हाेते. एल्लाळ यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केला.

दोन दिवसापासून कर्नाटकातील पोलिस थोरलीवाडी व परिसरातील गावात पहारा देवून आरोपींच्या शोधात होते. तेव्हा सोमवारी (दि. २६) आरोपींचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी उमरगा पोलिसांचेही पथक थोरलीवाडी व परिसरात धडकले. यावेळी १५ आरोपीला ताब्यात घेऊन कर्नाटक पोलिसांना सोपवण्यात आले आहे.

सायंकाळी बीदर पेालिस अधीक्षक डेक्का किशोर बाबू, कलबुर्गीच्या पोलिस अधीक्षक इशा पंत यांच्यासोबत आलेल्या २० ते २५ पोलिसांनी घटनास्थळ व परिसरात बारकाईने पाहणी केली. उमरग्याचे पोलिस निरिक्षक मनोज कुमार राठोड, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनीही शोध घेतला. सर्व आरोपी हे थोरलीवाडी व परिसरातील आहेत. थोरलीवाडी गावामध्ये कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून गावाला छावणीचे रुप आले आहे.