आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकी हक्कावरुन मारहाण:विषारी औषध पाजून एकास ठार मारण्याचा प्रयत्न ; पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रसाद कॉलनी माणिक चौक येथील शिवाजी पवार हे त्यांची पत्नी उषा हिच्यासह १४ डिसेंबर २०२२ रोजी सांजा गट क्र. ५९० मधील शेतात शेतबांध फवारणीस गेले होते. यावेळी सांजा ग्रामस्थ संजय व रणजित सुभाष सूर्यवंशी या दोघा भावांसह सतीश लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तेथे जमिनीच्या मालकी हक्कावरुन शिवाजी पवार यांना मारहाण केली. यावेळी शिवाजी यांची पत्नी उषा मोबाइलने घटना चित्रित करत असताना रणजीत यांनी त्यांचा मोबाइल हिसकला. संजय व रणजीत यांनी शिवाजी यांच्या पिशवीतील विषारी औषध काढून शिवाजी यांना जबरदस्तीने पाजून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिवाजी पवार यांनी १५ डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीवरून आनंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...