आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजावट:विदेशी फुलांची आकर्षक सजावट; वटपौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात विविध फुलांची सजावट

तुळजापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वटपौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि.१४) तुळजाभवानी मंदिरात देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभरात पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले तर रात्री उशिरा पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला.

पौर्णिमा व मंगळवारचा योग साधत भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. दिवसभर मुख दर्शनाला दोन तासांचा वेळ लागत होता. तत्पूर्वी पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तर सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ करण्यात आला व सकाळी ९ वाजता अभिषेक पूजा संपवण्यात आली. अभिषेक पूजेनंतर धुपारती व अंगारा काढण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांसह पुजारी, सेवेकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक पौर्णिमेला सजावट
पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या सिंहासनासह चोपदार दरवाजात देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रत्येक पौर्णिमेला देवी भक्त आवर्जून मंदिरात सजावट करण्यासाठी आग्रही असल्याची माहिती धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...