आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उस्मानाबाद आगारातून औरंगाबाद-हैदराबाद सेवा; एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रारंभ

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एक जून रोजी बस सेवेला प्रारंभ झाला. परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद आगारातून उस्मानाबाद ते औरंगाबाद ते हैदराबाद अशी नवीन बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एकाच वेळी उस्मानाबाद येथून औरंगाबाद आणि औरंगाबाद येथून थेट हैदराबाद अशी सुविधा उपलब्ध होणार आहे.

सामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लालपरीचा नुकताच वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिवशीचा मुहूर्त साधून उस्मानाबाद आगारातून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे आता उस्मानाबाद येथून शेकडो प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बसची सेवा सुरू करण्यात आली असली तरी आशा मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती. आता ही बस सेवा सुरू करण्यात आली. आतापर्यंत आगारातून मुंबई, पुणे, पनवेल, पणजीसह हैदराबाद या मार्गावर स्वतंत्र बसेस धावतात. मात्र, आशा पद्धतीची सेवा ही पहिल्यांदाच सुरू केली. शुक्रवारी या सेवेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी रात्री आगारात आगार प्रमुख पांडुरंग पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या सेवेला सुरुवात करण्यात आली.

या मार्गावर अशी सेवा असणारी एकमेव बस
या मार्गावर अशा पद्धतीची बस सेवा असलेली ही आगारातील एकमेव बस असणार आहे. कारण हैदराबाद येथून उस्मानाबाद मार्गे औरंगाबाद आणि औरंगाबाद शहरातून हैदराबाद अशी सेवा आहे. तशीच सेवा उस्मानाबाद ते हैदराबाद अशी सुद्धा आहे. परंतु उस्मानाबाद येथून औरंगाबाद आणि तेथून उस्मानाबाद मार्गे थेट गाडी हैदराबाद अशी ही बस धावणार आहे.

रात्री ८ वाजता आगारातून प्रस्थान
उस्मानाबाद आगारातून ही बस रात्री आठ वाजता औरंगाबाद साठी प्रस्थान करणार आहे. तेथे मुक्काम करून ही बस सकाळी ११ वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथून निघून उस्मानाबाद मार्गे हैदराबाद येथे पोहोचणार आहे. तेथून रात्री दीड वाजता उस्मानाबाद साठी प्रस्थान करेल.

नवीन गावांचा समावेश
पूर्वी उस्मानाबाद आगारातून हैदराबाद येथे जाण्यासाठी चार बसेस होत्या. त्यापैकी रात्री आठ वाजताच्या बसमध्ये औरंगाबाद हा मार्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद येथून येणाऱ्या प्रवाशांना लाभ होईल. महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरू केली आहे.
पांडुरंग पाटील, आगार प्रमुख.

बातम्या आणखी आहेत...