आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औराद येथील युवकाच्या कलाकृतीला पुरस्कार; विविध कलाकृती सादर

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाविष्काराच्या गुणाला व्यापकता मिळते. हे सिद्ध करून दाखवले आहे तालुक्यातील औराद येथील मदन किसन पवार या कलाकाराने. औराद येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मदनचे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण गुंजोटीच्या श्रीकृष्ण विद्यालयात झाले. शालेय जीवनापासुनच चित्र रेखाटण्याची आवड असल्याने पेटींग क्षेत्रात करियर करण्याचा निश्चय मदन याने केला आणि प्रतिकुल परिस्थितीत जिद्दीने यशाचे एक-एक टप्पे त्यांनी पुर्ण केले. वास्ताविकत: चित्र रंगविण्यात पोराचं आयुष्य यशस्वी होईल का असा संभ्रम आई-वडिलांना होता.

मात्र तोच पोरगा आता कुटुंबाचा आधार ठरला आहे. मदन पवार याने २००६ मध्ये औरंगाबादच्या शासकिय चित्रकला महाविद्यालयात कला शिक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ ऑर्ट्समध्ये बॅचलर ऑफ फॉइन आर्टमध्ये (बीएफए) प्रवेश घेताना त्यात पहिल्यांदा सीईटी (प्रवेश पूर्व परीक्षा) लागू झाली होती. यात मदनने सहाव्या रँकिंगमध्ये आल्याने बीएफएला प्रवेश मिळाला.चार वर्षांचे पदवी शिक्षणात गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याने २०१० साली मदनला फेलोशिप मिळाली, शिवाय सर जे.जे. स्कुल ऑफ ऑर्टमध्ये अध्यापनाची संधी ही मिळाली. सन २०१३ मध्ये मास्टर ऑफ फाइन आर्ट(एमएफए) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर गुजरात राज्यातील वडोदरा ऑर्ट रेसिडन्सीमध्ये कला क्षेत्रात उच्चतम ज्ञान प्राप्तीसाठी तीन महिन्याची संधी मिळाली. देशाभरातून आलेल्या विद्यार्थ्यामध्ये मदन हा महाराष्ट्रातुन एकमेव विद्यार्थी होता. मुंबई येथील विरार व्हीवॉ स्कूल ऑफ आर्चिटेक्चर येथे मदन पवार गेली अनेक वर्षांपासून अध्यापनाचे काम करतो आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर मदनला पुढच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पण ते जिद्दीने यशस्वी झाले.

दिल्लीच्या ललित कला अकादमीच्या पुरस्काराने गौरव
सन २०१५ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या ५६ व्या राष्ट्रीय प्रदर्शनात मदन पवार यांना राष्ट्रीय अकादमी पुरस्कार मिळाला. कोरोना संसर्गामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या स्थितीचे रेखाटलेले वस्तुस्थितीजनक व उत्तम कलाकृतीस महाराष्ट्र शासन कला संचालनालयाचा उत्कृष्ट कलाकृती पुरस्कार मिळाला.

बातम्या आणखी आहेत...