आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:सरपंच राजश्री वरपे यांना पुरस्कार‎

मस्सा (खं)‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी सरपंच राजश्री वरपे यांना राज्यस्तरीय‎ नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात‎ आले. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या‎ वतीने करण्यात आले होते. हा पुरस्कार‎ दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला‎ सरपंचाना वितरीत केला जातो. माजी सरपंच‎ राजश्री वरपे यांनी त्यांच्या सरपंच कालावधी‎ मध्ये ग्रामपंचायती च्या माध्यमातून विविध‎ योजनांच्या साहयाने सर्वसामान्य जनतेची‎ विविध विकास कामे केली आहेत.‎

याच कामाची दखल घेऊन माजी सरपंच‎ राजश्री धनंजय वरपे यांना जागतीक महिला‎ दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय नारी शक्ती‎ पुरस्काराने अहमदनगर येथे सिने अभिनेत्री‎ अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानित‎ करण्यात आले. यावेळी सरपंच सेवा संघाचे‎ संस्थापक बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष‎ रोहीत संजय पवार, राज्य संपर्क प्रमुख‎ अमोल शेवाळे, विश्वस्त सुजाता कसार व‎ इतर पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...