आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मयूर काकडे यांना मंुबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्येयपूर्ती २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नूतन गुळगुळे फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळ्याचे यंदा सहावे वर्ष होते. हा सोहळा शनिवारी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला.भारतातून पुरस्कारांसाठी जवळपास ३६५ प्रवेश अर्ज आले होते, त्यातून ९ पुरस्कार दिले गेले असून,त्यांची घोषणा व पुरस्कारांचे वितरण एकाचवेळी जाहीर करण्यात आली होती.
सोहळ्यास नानावटी मॅक्स हॉस्पिटलचे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ. संजय दुधाट, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर तसेच कोचिन शिपियार्ड लिमिटेडच्या संचालक आम्रपाली साळवे, नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन विनायक गुळगुळे यांची उपस्थिती होती.
यावेळी मयुर काकडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मयूर काकडे यांना निसर्गाने जन्मतःच अपंगत्व दिले असले तरी आपल्या सदृढ मनाने त्या अपंगत्वावर मात करून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आणि सदृढ लोकांनाही आपला आधार वाटणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आपल्या सामाजिक कार्याची त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.