आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथील यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेचा २०२२ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार उमरगा येथील उपक्रमशील शिक्षक, लेखक व कवी राजेंद्र सगर यांना प्रदान करण्यात आला. सगर हे एकुरगा (ता. उमरगा) येथील श्री शिवशक्ती विद्यालयात कार्यरत आहेत. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुणे येथील पत्रकार भवनात शुक्रवारी (दि. ३) झाला. सहायक पोलिस आयुक्त सुनील खदळकर, जीएसटी निरीक्षक डॉ. प्रेमिला तलवाडकर, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे (सोलापूर) माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर, लिज्जत पापड उद्योग समूहाचे (पुणे) मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, माजी सहकार आयुक्त तथा सहकार सचिव अॉड. एस. बी. पाटील, यशवंती आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक राजेश दिवटे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराने स्वरूप आहे. सगर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.