आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:आदीनाथ पालके साने गुरुजी‎ कथामाला पुरस्काराने सन्मानित‎

गणेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील अतरगाव हायस्कूलचे‎ सह शिक्षक आदीनाथ चांगदेव पालके याना‎ आखील भारतीय साने गुरुजी कथामाला‎ उस्मानाबाद जिल्हा समितीचे अध्यक्ष प्रमचंद‎ देवसाळे याच्या हस्ते शाल व फेटा बाधून ट्रॉपी व‎ प्रमाणपञ देउन गौरविण्यात आले.

अखिल‎ भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती‎ उस्मानाबाद जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर व‎ उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त‎ विद्यमाने ५५ वे राष्ट्रीय अधिवेशन शिक्षण महर्षी सि.‎ ना. आलुरे गुरुजी नागरी जवाहर कला विज्ञान व‎ वाणिज्य महाविद्यालय अणदूर येथे झाले. यावेळी‎ उस्मानाबाद जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकाचा गौरव‎ करण्यात आला. यामध्ये भूम तालूक्यातील अंतरगाव‎ हायस्कूलचे सहशिक्षक आदीनाथ चांगदेव पालके‎ यांना साने गुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात‎ आले. यावेळी प्रेमचंद देवसाळे, संतोष खैरे, पोपट‎ बांगर आदी शिक्षक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...