आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळी:अपघात स्मृती पीडितदिनी केली नियमांविषयी जागृती ; ग्रस्तांना वाहण्यात आली श्रद्धांजली

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघात स्मृती पीडित दिनानिमित अपघातातील मृतांना जिल्हा पोलिस दल व आरटीओ विभागाने श्रद्धांजली अर्पण करुन अपघात घडू नयेत म्हणून जागृती केली. दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसरा रविवार अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अपघात स्मृती पीडित दिन साजरा होतो. पोलिस दल व आरटीओच्या विद्यमाने रविवारी मुख्यालयातील मैदानावर अपघातात बळी गेलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ मेणबत्या प्रज्वलित करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आणि पोलिस अधिकारी- अंमलदार तसेच मोटार मालक संघाचे जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण उपस्थित होते.अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे, सिट बेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...