आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मातोळ्यात नागरिकांमध्ये कायद्यांबाबत जागर ; कायदेविषयक शिबिर उत्साहात

उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोपी व्यक्तीला अटक झाल्यावर कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक व वकिलाला करता येते. आरोपी त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतो. याला पोलिस हरकत घेऊ शकत नाहीत. पोलिसांनी व्यक्तीला २४ तासांपेक्षा अधिक वेळ ताब्यात ठे‌वणे बेकायदेशीर आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी दिली.

फिरते विधी सेवा न्यायालय योजनेंतर्गत उमरगा तालुक्यातील गावांमध्ये लोकन्यायालय व शिबिरे घेण्यासाठी १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथून उमरगा न्यायालयात एक भ्रमण वाहन आले होते. तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळाच्या विद्यमाने मातोळा येथे सायंकाळी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश मनिषा चराटे, न्यायाधीश एस. ए. कानशिडे, न्यायाधीश एस. एच. राठी, न्यायाधीश एम. पी. मथुरे, अॅड. एस. व्ही. सगर, सहकारी अभियोक्ता अॅड. एस. के. घोडके, अॅड. व्ही. एस. आळंगे, अॅड. एस. के. बिराजदार, सरपंच गिरी विकास, उपसरपंच भोसले आदी उपस्थित होते.

ॲड. व्ही. एस. आळंगे यांनी आरोपींचे कायदे यावर मार्गदर्शन केले. अॅड. एस. ए. पोतदार यांनी महिलांच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. ग्रामस्थ व विधिज्ञ मंडळाचे पदाधिकारी, विधिज्ञ उपस्थित होते. अॅड. जी. के. गायकवाड, विधिज्ञ मंडळ, हनुमान नागरी पतसंस्था व ग्रामपंचायत कार्यालयाने हे आयोजन केले. अॅड. एस. पी. इनामदार यांनी प्रास्ताविक करुन सूत्रसंचालन केले. पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब भोसले यांनी आभार मानले.

फिरत्या लोक न्यायालयात १० प्रकरणे निकाली उच्च न्यायालय विधी सेवा समिती औरंगाबाद, लोक न्यायालयातंर्गत अंतर्गत मोबाइल व्हॅनमध्ये लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीत एक पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलवर दिवाणी न्यायाधीश एस. एच राठी, पंच म्हणून अॅड. एस. पी. इनामदार सदस्य होते. फिरत्या लोक न्यायालयात संक्षिप्त फौजदारी प्रकारचे एकूण ११ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १० प्रकरणात १९ लाख ७९ हजार १९४ इतक्या रक्कमेत तडजोड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...