आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याचा जागर:सांजा ग्रामपंचायतीत कायद्यासह हक्काबाबत नागरिकांत जनजागृती

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांना कायदा समजावा, आपले हक्क, अधिकार कळावेत, यासाठी कायद्याबाबत जागृतीसाठी ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान जनजागृती अभियान राबवण्यात येत असून शुक्रवारी (दि.४) उस्मानाबाद तालुक्यातील सांजा ग्रामपंचायतीत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश बी. यू. चौधरी, दिवाणी न्यायाधीश दासरी, दिवाणी न्यायाधीश रवी कुलकर्णी यांनी भेट देऊन जनजागृती केली.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सतीश सूर्यवंशी होते. यावेळी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश बी. यू. चौधरी, दिवाणी न्यायाधीश दासरी, दिवाणी न्यायाधीश रवी कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये कायदा आणि कोर्ट हे दोन शब्द आपल्याकडे खूप आदराने घेतले जातात. भारतीय संविधानाची चौकट मजबूत करणारी पायरी म्हणजे कायदा होय. शंभर अपराधी सुटले तरी चालतील मात्र एका बिन अपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये, हे ब्रीद घेऊन देशाच्या कायद्याची वाटचाल सुरू आहे.

कोर्ट आणि पोलिस म्हटले की अनेक जण घाबरतात. मात्र, समाजाला शिस्त लावून न्यायाचे राज्य निर्माण करण्यासाठी हे घटक निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपण कायद्याची चौकट मोडणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप उपसरपंच सतीश सूर्यवंशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत लिपिक तुकाराम चांदणे यांनी तर आभार राकेश सूर्यवंशी यांनी मानले.

हक्क, अधिकार कळण्यासाठी जागृती
‘कायद्याचं बोला, जॉली एलएलबी, मीटर गुल बत्ती चालू, जय भीम’, अशा अनेक चित्रपटांनी कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही कायदेविषयक अज्ञान आणि भीती कायम आहे. ग्रामीण भागात एखाद्या बहुरुप्याला बघून अनेक लोक घाबरतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना कायदा समजावा. हक्क आणि अधिकार कळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याने वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...