आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:बालमजुरी विरोधी दिनानिमित्त मोहिमेतून जनजागृती

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहिमेच्या रथाचे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जनजागृती यात्रेतून जिल्ह्यातील किशोरवयीन शाळेत जावीत, त्यांना बालकामगार म्हणून काम करावे लागू नये, याबाबत जनजागृती करण्यात आली. १४ वर्षांखालील सर्व मुलांनी मोफत शिक्षणाचा हक्क बजावून शालेय शिक्षण पूर्ण करावे, सर्वांनी बालमजुरीला विरोध करावा, कोठेही बालकामगार मजुरी करताना आढळल्यास नजीकच्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कळवावे. तसेच १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर सांगावे, सांगणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल, असे आवाहन सुधाकर कोनाळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...