आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती कार्यक्रम:जागतिक एड्स दिनानिमित्त‎ ग्रामीण रुग्णालयाकडून जागृती‎

भूम‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शंकरराव पाटील कनिष्ठ‎ महाविद्यालयात जागतिक एड्स‎ दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या‎ वतीने जनजागृती करण्यात आली.‎ ग्रामीण रुग्णालयाकडून जनजागृती‎ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.‎ त्या अनुषंगाने शंकरराव पाटील‎ कनिष्ठ महाविद्यालयात एड्स‎ विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात‎ आला.

या कार्यक्रमात ग्रामीण‎ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.‎ विजयकुमार सुळ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली ग्रामीण‎ रुग्णालयातील समुपदेशक एस. डी.‎ तटाळे यांनी ‘आजचा युवक आणि‎ त्यांची विचार पद्धती'' यावर‎ मार्गदर्शन केले.

तसेच‎ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये‎ एचआयव्ही व एड्स विषया‎ जनजागृती केली. याप्रसंगी‎ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए. एल. शेरकर,‎ एम. एल. सरवदे, कुष्ठरोेग तंत्रज्ञ‎ पानसरे, आर. व्ही. झिंगे, प्रभारी‎ प्राचार्य गोपाळघरे , प्रा. काळे, प्रा.‎ पठाण, प्राध्यापक, कर्मचारी व‎ विद्यार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...