आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी सेवा:उच्च न्यायालयाच्या रथातून होणार अधिकारांची जागृती ; हिरवा झेंडा दाखवून उपक्रमास सुरुवात

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील उच्च न्यायालय खंडपीठाच्या उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे फिरत्या रथाद्वारे नागरिकांच्या अधिकाराची व योजनांबाबत जागृती केली जाईल. रथाला जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. एस. शेंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवानगी करण्यात आली. सचिव वसंत यादव, जिल्हा न्यायाधीश वर्ग-१ आर. एस. गुप्ता, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे सदस्य अॅड. मिलिंद पाटील, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस.आर. मुंढे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...