आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जावळे पाटील महाविद्यालयास नॅकची बी प्लस ग्रेड‎

लोहारा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा येथील शंकरराव जावळे‎ पाटील वरिष्ठ महाविद्यालयास‎ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता‎ परिषद समितीने बी प्लस ग्रेड दिला‎ आहे.‎ दि. २४ व २५ जानेवारीला राष्ट्रीय‎ मूल्यांकन आणि मान्यता परिषद‎ समितीने लोहारा येथील शंकरराव‎ जावळे पाटील वरिष्ठ‎ महाविद्यालयास भेट देऊन‎ महाविद्यालयातील भौतिक व‎ शैक्षणिक सोयी सुविधांची पाहणी‎ केली होती.

महाविद्यालयातील सर्व‎ विभाग ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा‎ योजना, सांस्कृतिक विभाग, स्पर्धा‎ परीक्षा विभाग, क्रीडा विभाग,‎ सायन्स विभाग, कॉमर्स विभाग या‎ सर्व विभागाची नॅक समितीने‎ अतिशय बारकाईने तपासणी केली.‎ यानंतर समितीने पालक, माजी‎ विद्यार्थी, महाविद्यालयातील‎ प्राध्यापक आणि शिक्षकेतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व‎ चर्चा केली.

सायंकाळी‎ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी‎ पारंपारिक लोककला व सांस्कृतिक‎ कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या‎ दिवशी म्हणजे २५ जानेवारी रोजी‎ नॅक समितीने कार्यालय, महिला‎ कक्ष, खेळाचे मैदान यास प्रत्यक्ष‎ भेट देऊन पाहणी केली. यानंतर नॅक‎ समितीने आपला अहवाल तयार‎ करून एक्झिट मीटिंगमध्ये‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.‎ विनायक पाटील यांच्याकडे सुपूर्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केला.‎ यावेळी समितीचे अध्यक्ष प्र.‎ कुलगुरू भगवान दास यांनी‎ महाविद्यालयात कोणत्या सुधारणा‎ करायच्या आहेत याविषयी‎ मार्गदर्शन केले. तसेच‎ महाविद्यालयामध्ये कोणते उपक्रम‎ चांगले राबविलेले आहेत.‎ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी‎ केलेल्या फाइल्स उत्कृष्ट दर्जाच्या‎ आहेत असेही त्यांनी याप्रसंगी‎ सांगितले. त्यांनी महाविद्यालयातील‎ गुणवत्ता वाढीसाठी सूचनाही केल्या.

‎यावेळी संस्थेचे रमेश जावळे‎ पाटील, प्रा.डॉ. शेषेराव जावळे‎ पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ प्राचार्य उर्मिला पाटील, डॉ. किरण‎ पाटील, वसंतराव पाटील, जनार्दन‎ पाटील, मनोज पाटील यांच्यासह‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा‎ योजनेचे कार्यक्रमाधिकारी विनोद‎ आचार्य, डॉ. सोनवणे, सांस्कृतिक‎ विभाग प्रमुख डी.एन. कोटरंगे,‎ स्पर्धा परिक्षा समन्वयक प्रा. डॉ.‎ गायकवाड, प्रा. डॉ. आर. एम.‎ सुर्यवंशी, प्रा. डॉ.एस. एस. कदम,‎ प्रा. डॉ. सी जी. कडेकर, प्रा. डॉ. बी.‎ एस. राजोळे, प्रा. डॉ. पी. व्ही. माने,‎ प्रा. डॉ. आर.एस. धप्पाधुळे, प्रा.‎ नितीन आष्टेकर, प्रा. बी बी मोटे,‎ ग्रंथपाल प्रा. मगर, उपस्थित होते.‎ महाविद्यालयास बी प्लस‎ मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव प्रा.‎ डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी‎ महाविद्यालयातील शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...