आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल करत एका 80 वर्षीय वृद्धाने बच्चू कडूंची गाडी अडवली. काल धाराशीव येथे ही घटना घडली. बच्चू कडू डाकूसोबत गेले असे म्हणत वयोवृद्ध आजोबांनी भररस्त्यात बच्चू कडूंना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले वयोवृद्ध?
वयोवृद्ध आजोबा अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंचा हात पकडून, तुम्ही असे का वागायला लागले आहात, जरा नीट वागा… राज्यघटनेच्या चौकटीत वागा. जनतेला त्रास देऊ नका. अशा शब्दांत बच्चू कडूंना सुनावले. बच्चू कडू यांनी देखील काय त्रास देतोय असे हसतहसत विचारले.
काढता पाय घेतला
यावेळी बच्चू कडूंच्या यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वयोवृद्धाने, ही गद्दारी नाही, तर गद्दारीचा बाप आहे का? यांचे वागणं नीट आहे का? असे सवाल उपस्थित केले. परिस्थिती बिघडत असल्याचे दिसताच बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना घेत काढता पाय घेतला.
कडूंचे वागणे योग्य नाही
बच्चू कडू जात असताना अर्जुन भगवान घोगरे त्यांच्या गाडीसमोर येत हातवारे करत बोलत होते. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अर्जुन भगवान घोगरे म्हणाले, त्यांचे वागणे योग्य नाही. त्यांनी जनतेबरोबर गद्दारी केली. ते एका डाकूबरोबर गेले. बच्चू कडूंना ज्या धोरणाने, ज्या आशेने निवडून दिले तसे ते वागत नाहीत. हे जे चालले आहे, ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे.
राऊतांकडून शेर ट्विट
खासदार संजय राऊत यांनीही वयोवृद्ध शेतकऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक शेरही ट्वीट केला आहे. "तुमने बेवफाई की वफ़ा का नाम लेकर। हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर। तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर। हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर ।"
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.