आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यथा:बच्चू कडूंनी घेतला टपरीवर चहा‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी दुपारी‎ २.३० ते ३ वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीत बसून चहा‎ घेतला. दरम्यान, कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.‎ त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पीक विमा, अतिवृष्टीतील‎ अनुदान मिळत नसल्याची व्यथा मांडली. त्यांनी पाठपुरावा‎ करण्याचे आश्वासन दिले.‎ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व अमरावती‎ जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार‎ वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले बच्चू कडू‎ गुरुवारी (दि.२) उस्मानाबादेत आले होते.

त्यांनी युवकांचे‎ संघटन करून शेतकरी, दिव्यांगासह अन्य प्रश्न आक्रमकपणे‎ समोर आणले. त्यांच्यावर विविध आंदोलनातील दीडशे ते‎ २०० गुन्हे आहेत. यातील एका गुन्ह्यातील न्यायालयीन‎ प्रक्रियेसाठी उस्मानाबाद काेर्टात आले होते. दरम्यान, त्यांनी‎ कोर्टासमोरील मल्लिनाथ सारने यांच्या टपरीत बसून चहा‎ घेतला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा,‎ अतिवृष्टीतील अनुदानासह इतर व्यथा मांडल्या.‎

... तेव्हा बेरगवाले फुटू जातील‎
बच्चू कडू यांना माध्यमांनी अर्थसंकल्प व इतर प्रश्न‎ विचारले. तुम्ही सेनेची साथ सोडली. त्यांच्यासोबत‎ वंचित, संभाजी ब्रिगेड आले, असा प्रश्न विचारला.‎ यावेळी ते म्हणाले, त्यांनी सेनेसोबत वंचित, ब्रिगेड‎ हे राजकीयदृष्ट्या एकत्र आले का? त्यांचे काही मुद्दे‎ ठरले आहेत का? काहीच ठरले नाही. जेव्हा‎ अंतर्मनातून रंग बाहेर येईल तेव्हा बेरंगवाले फुटून‎ जातील.‎

बातम्या आणखी आहेत...