आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन:बहु असोत सुंदर...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा; जिल्हाभरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण

उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

परंड्यात महाराष्ट्र दिन उत्साहात
परंडा तालुक्यासह शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय सेवाभावी संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करुन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. १) महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ८ वाजता तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महसुल कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर तहसीलच्या वतीने पेशकार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पंचायत समिती कार्यलयात गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कर्मचारी उपस्थित होते. पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सीना कोळेगाव विभागीय कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, पशु चिकित्सालय, भूमिअभिलेख कार्यालय, सहायक निबंधक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. रा. गे. शिंदे महाविद्यालय, श्री शिवाजी महाराज विद्यालय, कै. महारुद्र मोटे विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर, बावची विद्यालय, संत मीरा पब्लिक स्कूल, एसपी महाविद्यालय, कै. रावसाहेब पाटील विद्यालय, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्यालय, ग्लोबल इंग्लिश स्कूल, खंडेश्वर इंग्लिश स्कूल तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

पोलिस नाईक सचिन कळसाईन यांना पोलिस पदकाने गौरव
येथील पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सचिन कळसाईन यांना महाराष्ट्र दिनी रविवारी (दि.१) पोलिस पदक देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलिस महासंचालकांच्या वतीने ३० एप्रिल रोजी पोलिस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पोलिस अंमलदारांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सचिन कळसाईन यांनी पोलिस खात्यात कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कार्य केले आहे.

याबद्दल त्यांना पदक जाहीर झाले होते. महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते कळसाईन यांना पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आर. एम. ठाकूर वाहतूक शाखा उस्मानाबाद, के. बी. रोकडे उस्मानाबाद ग्रामीण, जी.आय. पठाण लोहारा पोलिस, एच. एम. पठाण कळंब पोलीस, आर. डी. कवडे तुळजापूर मंदिर चौकी, आर. डी. कचरे उस्मानाबाद पोलिस यांना देखील पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

उमरगा तालुका, शहरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
तालुक्यासह शहरात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात रविवारी (दि. १) ६२ वा महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. शहरात उपविभागीय कार्यालयात सकाळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

माजी खासदार रवींद्र गायकवाड, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार पांचाळ, बाबूराव शहापुरे उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी कदम, काजळे उपस्थित होते. अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायधीश डी. के. अनभुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शहरातील नगर परिषद, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती कार्यालय, बांधकाम विभाग, उपविभागीय पोलिस कार्यालय, उमरगा जनता बँक, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, काँग्रेस समिती भवन, भारत विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, शरणाप्पा मलंग विद्यालय, शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज, शिवाई ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, महात्मा बसवेश्वर विद्यालय, कु. माधवी चालुक्य विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला आदीसह शहर व तालुक्यातील विविध जिप व खासगी शाळेत ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सरपंच सुनीता पावशेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ग्रापं सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संचालक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कोरेगाववाडी येथे शिवाई चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ फार्मसी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, प्राचार्य महेश कदारे, प्रा. अजय बेडदुर्गे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यात कडदोरा जिल्हा परिषद शाळेत शाळेत शालेय समितीच्या अध्यक्षा सुजाता शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त शालेतील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी सरपंच सुनंदाताई रणखांब, मुख्याध्यापक देविदास पावशेरे, ग्रामसेवक ए. ए. शेख उपस्थित होते.

शहरात कै. शरणप्पा मलंग विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग यांच्या हस्ते प्रतिमापूजन, सचिव एस. के. व्हंडरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जेष्ठ सदस्य, मुख्य्याद्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आदर्श विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे जेष्ठ संचालक भाऊराव सोमवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, प्राचार्य सोमशंकर महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक शिवराज औसेकर, माजी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

हुश्श.. आम्ही पास झालो
तालुक्यातील शाळांमध्ये वर्षभर शिकलेल्या अभ्यासक्रमाचे प्रगतीपत्रक रविवारी ध्वजारोहण झाल्यावर विद्यार्थ्यांच्या हाती पडले. बहुतांश विद्यार्थ्यांना अ-२, ब-१ व ब-२ याच श्रेणीत ठेवल्याचे प्रगती पत्रकातून स्पष्ट होत होते. शिक्षण विभागाच्या वतीने सुट्या मिळाल्याने पुढील वर्गात जाण्यासाठी विद्यार्थी शाळेकडे फिरकणार नसले तरी पालकांना मात्र आतापासून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची तयारी करावी लागणार आहे. कोरोना काळात ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यास घेवून हैराण झालेल्या शिक्षकांना यंदा सुटीच्या काळात कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण अद्याप तरी नसल्याने सर्वच शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याचे दिसून येत होते.

बातम्या आणखी आहेत...