आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Baliraja Was Alarmed By The Infestation Of Vermin Along With The Lack Of Rain; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​| Marathi News

नैसर्गिक संकट:पावसाच्या कमतरतेसह किडीच्या प्रादुर्भावाने बळीराजा धास्तावला; ​​​​​​​ जिरायती क्षेत्रावरील सोयाबीनसह इतर पिके धोक्यात

शिराढोण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील शिराढोमसह परिसरात पावसाचा काही दिवसांपासून खंड पडला आहे. त्यासह खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी धास्तावला आहे. शिराढोण मंडळात ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. परिसरात २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्रावर पेरणी केलेल्या सोयाबीनसह इतर पिके धोक्यात आली आहेत. तसेच पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. शिराढोण मंडळात जूनपासून सततच्या पावसाने अगोदरच पिकांचे नुकसान झाले. त्यात २० दिवसांपासून दडी मारल्याने जिरायती क्षेत्रावरील पिके वाळू लागली आहेत.

यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिकांनी माना टाकल्या आहेत. पिकांवर वेगवेगळ्या कीडींच्या प्रादुर्भावामुळे पानांची चाळणी झाली आहे. फवारणीच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात घट येणार आहे. सोयाबीनवर येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळेही पीक संकटात आले आहे. सर्व घटकांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे शिवार पिवळे पडत आहे.परिसरात पावसाने मारलेल्या दडीमूळे उष्ण व कोरडे हवामान तयार झाल्याने सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिबंधासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

उष्ण, कोरडे हवामान सोयाबीनसाठी घातक
सोयाबीनची पेरणी केल्यानंतर पीक उगवणी ते काढणी दरम्यान उष्ण व कोरड्या हवामानामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यात तुडतुडे, खोडमाशी, लष्करी अळी, पाने पोखरणारी अळी, गुंडाळणारी अळी, शेंगा पाखरणारी अळी आदी कीडींमुळे पिकाचे नुकसान होते. यातील काही अळ्या जमिनीच्या आतूनही पीक नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. परिसरात सध्या उष्ण व कोरडे वातावरण असल्यानेच सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.

मोझॅकचा प्रादुर्भाव, सोयाबीनवर ५ फवारण्या
माझ्या शेतात सोयाबीनवर आतापर्यंत पाच फवारण्या केल्या. परंतु शेतात येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने उभे पीक माना टाकत आहे.
बापूसाहेब सोमासे, शेतकरी, शिराढोण.

बातम्या आणखी आहेत...