आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:आयुर्वेद महाविद्यालयावरील अरिष्ट दूर, प्रवेश सुरू, 19 नवीन प्राध्यापक

उस्मानाबाद / उपेंद्र कटके2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्यापन करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे यावर्षी येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रथमवर्षाचे प्रवेश होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता हे अरिष्ट टळले असून विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. केंद्रीय आयुष विभागाच्या पथकाने मनुष्यबळाच्या कमतरतेची त्रुटी काढल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. शासनाने तातडीने भरती करण्याची मान्यता दिल्याने १९ नवीन प्राध्यापक मिळणार आहेत.

येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला दरवर्षीप्रमाणे केंद्रीय आयुष विभाग व नाशिकच्या वैद्यकीय विद्यापीठाच्या पथकाने भेट दिली होती. यावेळी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा तसेच मनुष्यबळाचे ऑडीट करण्यात आले होते. यामध्ये सुविधा चांगल्या असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी प्राध्यापकांची कमरता असल्याचा अहवाल दिला होता.

प्राध्यापकांचे मानधन वाढवले अहर्ताधारक बीएएमएस पदवी व पदयुत्तर पदवीधारक कंत्राटी पदांमुळे तसेच कमी मानधन असल्याने अध्यापनासाठी अनुकूल नव्हते. मात्र, यावेळी मात्र, मोठे मानधन देण्यात येणार आहे. प्राध्यापकांसाठी पूर्वी ६० हजार मानधन होते, आता एक लाख, सहायोगी प्राध्यापकांना आता पूर्वी ५० हजार तर आता ८० हजार, सहाय्यक प्राध्यापकांना पूर्वी ४० हजार मानधन मिळायचे आता दरमहा ७० हजार मानधन देण्यात येत आहे.

२००८ मध्ये ६ जणांचे राजीनामे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात १९८६ मध्ये झाली होती. तेव्हापासून केवळ २००८ मध्येच प्रथम वर्षासाठी प्रवेश होऊ शकले नव्हते. त्यावेळीही प्राध्यापकांची कमतरता होती. मात्र, तोडगा म्हणून मुंबईच्या सहा प्राध्यापकांची बदली येथे केली. तेव्हा सहा जणांनीही बदली नको म्हणून राजीनामे दिले. ऐनवेळी प्राध्यापक उपलब्ध न झाल्याने त्रुटीची पुर्तता झाली नव्हती.

अन्य नेत्यांनी वजन वापरून प्राध्यापक वळवले यावर्षी बारामती व जळगावला नवीन महाविद्यालय सुरू झाले. यामुळे प्राध्यापकांना तिकडे वळवण्यात आले. तेथील दोन नेत्यांनी राजकीय वजन वापरून बदल्या करून घेतल्याचे समजते. यामुळे उस्मानाबादवर अरिष्ट आले होते.

क्षमता वाढवण्याचा प्रयत्न येथील महाविद्यालयाकडे इमारत व सुविधा चांगल्या आहेत. १०० कर्मचारी निवासस्थान असलेले हे राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे. मात्र, विद्यार्थी प्रवेश क्षमता ६३ वर मर्यादीत आहे. आता ही क्षमता १२५ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...