आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला निवेदन:उमरग्यात अनधिकृत विक्रेत्यांना वस्तू विक्रीस बंदी घाला

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व शहरातील वाढत्या बाजारपेठेतील अनधिकृत विक्रेत्यांना वस्तू विक्रीसाठी बंदी घालण्यासह शासकीय जागेवर अतिक्रमणाबाबत उमरगा व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) पोलिस निरीक्षक, पालिका प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेत निवेदन देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस व पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील व्यापारी हा नुकताच कोरोना संकटातून सावरण्याच्या स्थितीत आहे. अशावेळी बाहेरून येणाऱ्या व रोडवर बसून कापड, रेडिमेड, हार्डवेअर, स्टेशनरी, फुटवेअर, फर्निचर, ड्रायफ्रूट, मणेरी यासह विविध प्रकारचे विक्रेते अनधिकृतपणे विक्री करत आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठेतील दुकानदारांना याचा आर्थिक फटका बसत आहे. अशा विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होण्यासह शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा मोडून झळ बसत आहे.

त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना साहित्य विक्रीसाठी मज्जाव करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. शहरातील व्यापाराचे हित लक्षात घेवून येत्या दोन दिवसात कारवाई करावी, अन्यथा सोमवारपासून (दि. २२) बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, माजी उपाध्यक्ष भागवत सोनवणे, सल्लागार, ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण तोतला, पोलिस निरीक्षक मनोज राठोड, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. जाधवर, पालिका प्रतिनिधी तुळशीराम व्हराडे, मंजूर शेख, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे, ज्येष्ठ व्यापारी दिलीप पोतदार, उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, पोलिस उपनिरीक्षक आर. बी. जाधवर, पालिका प्रतिनिधी तुळशीराम व्हराडे यांना निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...