आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढ:वांगे, गवार 80 रुपये किलोवर; मेथीची पेंडी 25 रुपयांना, कोथिंबीर घसरली

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीत खरीप हंगामासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक वांगे, गवारीचे दर ८० रुपये प्रति किलोवर गेले असून मेथीची पेंडी २५ रुपयांना मिळत आहे. टोमॅटोचे दर कमी झाले असून १५ ते २० रुपये किलोवर आहेत. कोथिंबीरीची आवक वाढल्याने ५ ते १० रुपयाला पेंडी मिळत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. काही भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पाण्यात राहिल्याने दर्जा घसरला आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्यासह इतर भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे दरवाढ झाली असून किरकोळ बाजारात वांगे ३० रुपये पाव किलोने विक्री होत आहे. मेथीची एक जुडी २५ ते ३० रुपयाला विक्री होत आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी, फुलकोबी, टोमॅटो, दोडका यासह इतर भाज्यांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद शहरातील देशपांडे स्टँड येथील भाजी मंडईसह शहरात विविध ठिकाणी व्यापारी व शेतकरी भाजीपाल्याची विक्री करतात.

परंतु, भाज्यांचे दर वाढल्याने पिशवीत एक किंवा दोनच भाज्यांची खरेदी केली जाते. अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे आठवडी बाजारासह भाजीमंडईत भाजीपाल्याची आवक घटली आहे. सध्या कांदा ३० ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे. आगामी काही दिवसांत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या कोथिंबीरीची आवक वाढली असून ५ ते १० रुपयांना पेंडी मिळत आहे. यंदा सतत ढगाळ वातावरण असल्याने कांद्यासह कोथिंबिर, कोबी, गवार पिवळी पडून वाया गेली आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आवक घटल्याने कांदा, कोबीसह कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ
बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे उपलब्ध भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. मिळेल त्या भावाने खरेदी करून विक्री करावी लागत आहे. यामुळे किरकोळ बाजारात वांग्यासह मेथी, कोबी, सेपू, गवार दुपटीने महागली आहे. सध्या टोमॅटोचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
-के. बी. शिंदे, भाजी विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...