आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळदुर्ग सकल जैन समाजाच्या वतीनेही जाहीर निषेध करण्यात आला असून याच्या निषेधार्थ २१ डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरातील जैन बांधवांनी आपली दुकाने बंद ठेऊन झारखंड सरकारचा जाहीर निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन तुळजापुरचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांना देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, जैन धर्मियांचे २४ तिर्थकरापैकी २० तीर्थंकर ज्या पवित्र भुमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यांतील मधुबन (जिल्हा गिरडोह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
या अनुषंगाने त्याठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत.जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तिर्थकर पवित्र मोक्ष भुमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भुमीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. नळदुर्ग परीसरातील सकल जैन मंदिर ट्रस्ट, संघटना, युवक व महिला मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी निषेध केला आहे.
या निवेदनावर नळदुर्ग शहर सकल जैन समाजाचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रविण कासार, नितीन कासार, नरेंद्र यादगिरे, अजित पाटील, शितल पाटील, मयुर पाटील, सुरज पाटील, सिद्धपा शेटगार, बाहुबली शेटगार, इंद्रजित पाटील, केवल पाटील, विकास पाटील,दिलीप पाटील,प्रतीक पाटील, अशोक कंदले, अमित पाटील, अक्षय आवटे, किरण पाटील, पक्ष्मरान कोटे, लोयांट पाटील यांच्यासह जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
परंड्यातही बंद
परंडा शहरही कडकडीत बंद ठेवून मुक मोर्चाद्वारे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.