आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:दाळींब ग्रामस्थांच्या वतीने बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा सत्कार

दाळींब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅड. जी. के. गायकवाड यांची विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दाळींब ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि.१९) सायंकाळी सत्कार करण्यात आला. सरपंच रंजनाताई सातपुते व उपसरपंच आसिफ शिलार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना अॅड. गायकवाड म्हणाले की, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत करुन सामाजिक सद् भाव राखण्याचा प्रयत्न केला.

यामुळे माझी निवड झाली आहे. याप्रसंगी अॅड. आळंगे, अॅड. पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, खय्युम चाकुरे, हिराजी पाटील, शिवानंद शिरोळे, धीरज इंगळे, हणमंत शिंदे, इरफान जहागिरदार, ओमप्रकाश टिकांबरे, बालाजी सातपुते, नदीम मुगळे, ग्रामपंचायत कर्मचारी सरफराज चाकुरे, हुसेन शेख, कुंडलिक अर्जुनकर, राम आयवाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...