आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातील झाडास गळफास:नापिकी; कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाडोळी (आ) येथील राम धर्मा गुंड (५८) या शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून सोमवारी (दि.१९) स्वतःच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ) येथील अल्पभूधारक शेतकरी राम धर्मा गुंड यांना पाडोळी (आ) शिवारातील गट नंबर ४३० मध्ये अवघी ९३ गुंठे जमीन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतातील उत्पन्नावरच भागवला जात होता.

यावर्षी त्यांनी आपल्या शेतात तीन वेळेस सोयाबीनचे बियाणे पेरूनही ते उगवले नाही. त्या नैराश्याने व उस्मानाबाद येथील एका पतसंस्थेचे कर्ज कसे फेडाचे? या चिंतेने त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि नातू असून पुढील तपास बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...