आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुरूम येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, शनिवारी (दि. ७) रोजी भव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
येथील बसवेश्वर चौक येथे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि. ३) जयंती साजरी करण्यात आली. मुरूम पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विलास वाडीकर यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रारंभी शहरातील प्रमुख मार्गावरून जयंती उत्सव मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
या वेळी उपाध्यक्ष शिवा दुर्गे, सचिव राजकुमार वाले, माजी अध्यक्ष दत्ता हुळमजगे, प्रताप गिरीबा, रवी अंबुसे, जगदीश निंबरगे, सहसचिव देवराज संगुळगे, राजकुमार लामजाणे, मनोज स्वामी, संतोष स्वामी, बादल गव्हाणे, सागर विभूते, नंदकुमार उपासे, मेघराज लादे, मल्लिनाथ सगरे आदींसह बसव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसव प्रतिष्ठानचे अभिवादन
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसव प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. शिवसेनेचे सर्कल प्रमुख चंद्रशेखर मुद्दकण्णा, प्रशांत मुद्दकना यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, खंडप्पा धुमा,अमित ढंगे आदींसह बसव प्रेमी उपस्थित होते.
आलूर येथे अभिवादन
आलूर ता. उमरगा येथे बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.